गोंदिया- गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तिल्ली मोहगाव येथे आज अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई दारूबंदी समितीच्या महिलांनी सकाळी 8 वाजता केली. आरोपीकडून अवैध देशी दारूसह नॅनो कार जप्त करण्यात आली आहे.
दारुची तस्करी करणाऱ्याला महिलांनी केले पोलिसांच्या स्वाधीन - दारु तस्करी
गावात पूर्णतः दारूबंदी झाली नसल्याने महिलांनी अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर पाळत ठेवली. त्याला आज सकाळी नॅनो कार, चार पेटी देशी दारूसह गावाबाहेरील पुलावर पकडले आणि पोलीसांच्या स्वाधीन केले.
जप्त केलेल्या दारूच्या पेट्या
तिल्ली मोहगावात दारूबंदी आहे. परंतु, याठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. यावर आळा बसवण्यासाठी महिलांनी दारूबंदी समिती तयार केली आहे. गावात पूर्णतः दारूबंदी झाली नसल्याने महिलांनी अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर पाळत ठेवली. त्याला आज सकाळी नॅनो कार, चार पेटी देशी दारूसह गावाबाहेरील पुलावर पकडले आणि पोलीसांच्या स्वाधीन केले. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीसह साहित्य जप्त केले आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
Last Updated : Mar 8, 2019, 11:12 PM IST