महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियात मारबताचा उत्साह.. शहरातील मिरवणुकीत कलम ३७० हटविल्याचा आनंद - मारबत उत्सव news

गोंदिया जिल्ह्याचा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा म्हणजेच मारबत उत्सव होय...समाजातील अनिष्ट रुढी-परंपरांचे उच्चाटन करण्यासाठी मारबताची मिरवणूक काढली जाते..गोंदिया शहरात नुकताच हा उत्साह पारंपरिकतेची जपवणूक उत्साहात पार पडला.

मारबत उत्सव

By

Published : Aug 31, 2019, 2:53 PM IST

गोंदिया -समाजातील वाईट प्रवृत्ती दूर होऊन चांगले विचार निर्माण व्हावेत, तसेच मानवी जीवन आरोग्यमय व्हावे, शेतकऱ्यांवरील दुष्काळाचे संकट दूर व्हावे यासाठी म्हणून शहरी भागासह ग्रामीण भागात देखील पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत हा सन मोठ्या उत्सव साजरा केला जातो.

गोंदिया शहरात मारबत उत्सव साजरा

जिल्ह्याचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा म्हणजेच मारबत उत्सव होय...समाजातील अनिष्ट रुढी-परंपरांचे उच्चाटन करण्यासाठी मारबताची मिरवणूक काढली जाते..गोंदिया शहरात नुकताच हा उत्साह पारंपरिकतेची जपवणूक उत्साहात पार पडला.

हेही वाचा...'घेऊन जा गे मारबsssssत', नागपुरात मारबत उत्सवाची तयारी पूर्ण, 'हे' आहे काळ्या, पिवळ्या मारबतींचे महत्त्व

गोंदिया जिल्ह्यात मारबताची ही परंपरा मागील १०० वर्षांपासून कायम असून ग्रामीण भागातील लोक आपल्या धान शेतीतील पीक रोग मुक्त व्हावे यासाठी नदी काठावरील माती आणून मातीची मारबत तयार करून पहाटे घरात फिरवून या मारबतला दुसऱ्या गावाच्या सीमेवर नेवून फेकतात.

हेही वाचा... 'घेऊन जा गे मारबsssssत', नागपुरात मारबत उत्सवाची तयारी पूर्ण, 'हे' आहे काळ्या, पिवळ्या मारबतींचे महत्त्व

शहरी भागात ताव आणि बांबूच्या साह्याने मारबत तयार करून शहरात या मारबताची मिरवणूक काढून शहरात फिरवले जाते. नदी काठावर आल्यावर शहरातील अनेक मारबत या ठिकाणी येऊन त्यांची गळा भेट करून त्यांचे सामूहिक दहन केले जाते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहराच्या विभिन्न भागातून गोंदियाच्या फुलंचूर नाल्यावर मोठ्या प्रमाणात मारबद आल्या होत्या. तर गणेश नगरातून निघणाऱ्या मारबदिला यावर्षी ६३ वर्ष पूर्ण झाल्याने आकर्षक मारबद तयार करण्यात आले होते.

हेही वाचा... नाट्यदिंडीसाठी संत्रानगरी सज्ज, मारबत आणि बडग्या ठरणार आकर्षण

इडा, पीडा, शेतकऱ्यांवरील दुष्काळ घेऊन रोग राई घेऊन जा गे मारबत... अशा घोषणा करत मारबतचे दहन करण्यात आले. शहरातून विविध वेशभूषेत निघणाऱ्या आकर्षित मारबतींना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या वर्षी चर्चेत असणाऱ्या कलम ३७० हटविल्याच्या आनंदात काढण्यात आलेली मारबत ही शहर वासीयांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. मारबत वर POK व ३७० कलम लिहून तिचेही दहन करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details