गोंदिया -नगर परिषदेअंतर्गत संलग्न दुसऱ्या आढवाड्यात ही कर वसुली मोहीम जोमात सुरु आहे. गोंदिया नगर परिषदे अंतर्गत येत असलेल्या शासकीय कार्यालयासह अनेक व्यवसायिक प्रतिष्ठाने व नागरिकांनी कर थकविल्याने नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली आगे. अनेकदा नोटीस दिल्या नंतर ही नागरीकासंह शासकीय कार्यालयांनी कराची रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्यामुळे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी करवसुली करीता मोहिम राबविण्यास सुरवात केली. या कारवाई अंतर्गत आत्तापर्यंत सुमारे ७३ लाखाची करवसुली झाली. असून आज सोमवारी राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री हे गोंदियात असताना नगर परिषदेच्या करवसुली पथकाने चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयालाच कुलूप ठोकल्याने खळबळ माजली आहे.
गोंदिया नगरपरिषदेने ठोकले सार्वजनिक बांधकाम विभागाला कुलूप, आतापर्यंत ७३ लाखाची कर वसुली - Gondia latest news
गोंदिया नगर परिषदेअंतर्गत नगरपरिषदेने सार्वजनिक बांधकाम विभागाला कुलूप लावले. आतापर्यंत ७३ लाखाची कर वसुली नगरपरिषदेने केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचा कर २०१८ पासून २ लाख २२ हजार ५४ रुपयाचे इतका थकीत असल्याने आज कार्यालय ला कुलूप ठोकण्यात आले. याच प्रमाणे युनियन बँकेच्या एटीएमचा ८५ हजार कर बाकी असल्याने एटीएमला ही कुलूप ठोकण्यात आले. इंडिया वन या एटीएम वर ७४ हजार कर शिल्लक असल्याने या एटीएमला ही कुलूप ठोकण्यात आले आहे. पुर्वी बीएसएनएलच्या कार्यालयाला सुध्दा कुलूप ठोकण्यात आले होते. त्याच प्रमाणे उद्या पासून नगर परिषद गोंदिया येथील मुख्य बाजार पेठेतील गंज वॉर्ड, देश बंधू वॉर्ड यावर कार्यवाही करणार असल्याचे उपमुख्य अधीकारी विशाल बनकर यांनी