महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gondia Local Body Elections 2021 : नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील भागात मतदानासाठी रांगा.. कडेकोट बंदोबस्त - Nagar Panchayat Election 2021

गोंदिया जिल्ह्यातील (Gondia Local Body Elections 2021 ) देवरी तालुका नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील क्षेत्रातील रेहळी येथील मतदान केंद्रावर चक्क पोलीस छावणीचे (Tight security on voting center in Gondia) स्वरूप आले आहे. या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. गावातील मतदार सकाळी 7 वाजल्यापासून मतदानास सुरवात झाली असून दुपारी 3.30 पर्यंत मतदान होणार आहे. या नक्षल भागातील लोक आपल्या मतदानाचा हक्क बजाविण्याकरिता सकाळपासूनच रांग लावलेले आहे

Gondia Local Body Elections
Gondia Local Body Elections

By

Published : Dec 21, 2021, 3:50 PM IST

Updated : Dec 21, 2021, 3:55 PM IST

गोंदिया - गोंदिया जिल्ह्यात (Gondia Local Body Elections 2021) जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायतीसाठी आज मतदान होत असून जिल्ह्यातील देवरी तालुका नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील क्षेत्रातील रेहळी येथील मतदान केंद्रावर चक्क पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. (Tight security on voting center in Gondia) या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. गावातील मतदार सकाळी 7 वाजल्यापासून मतदानास सुरवात झाली असून दुपारी 3.30 पर्यंत मतदान होणार आहे. या नक्षल भागातील लोक आपल्या मतदानाचा हक्क बजाविण्याकरिता सकाळपासूनच रांग लावलेले आहे. यावेळी देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी रेहळी मतदान केंद्राचा आढावा घेतला. संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे दिसून आले आहे.

नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील भागात मतदानासाठी रांगा

राज्यातील (Maharashtra Local Body Elections 2021) 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (Nagarpanchayat election 2021) पहिल्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्याची 07 डिसेंबर ही शेवटची तारीख होती. राज्यात महाविकास आघाडीअंतर्गत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रस असे तीन पक्ष एकत्र असताना स्थानिक पातळीवर मात्र कुठे युती तर कुठे स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

हे ही वाचा -Bhandara Congress Rebellion : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या भंडाऱ्यात काँग्रेसमध्ये बंडखोरी उफाळली, पाच पदाधिकारी सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित

Last Updated : Dec 21, 2021, 3:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details