महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MPSC Passed Preeti Patle : चहावाल्याच्या मुलीचे यश! 'पीएसआय'ची परीक्षा उत्तीर्ण;पहा कसा केला अभ्यास

वडील चहाचे दुकान चालवतात. आई घरचे काम करते. आम्ही तीन्ही भावंड आहोत. घरी दीड एकर जमीन आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात ओढातान होत होती. (Preeti Patle interacted with ETV Bharat) मात्र, परिस्थितीवर मात करत सातत्याने अभ्यास करत राहीले. त्याचे शेवटी यश मिळाले आहे अशी प्रतिक्रिया प्रीती सुरेश पटले या (MPSC)ची परीक्षा उत्तीर्ण तरुणीने दिली आहे.

प्रीती सुरेश पटले 'पीएसआय'ची परीक्षा उत्तीर्ण झाली
प्रीती सुरेश पटले 'पीएसआय'ची परीक्षा उत्तीर्ण झाली

By

Published : Mar 27, 2022, 1:30 PM IST

गोंदिया - गोंदिया शहरातील एका चहा विक्रेत्याच्या मुलीने न पुणे, न नागपूर, न कोचिंग क्लास. स्वतः अभ्यास करत (MPSC)ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ती आता पोलीस उपनिरीक्षक झाली आहे. (Preeti Patle Passed MPSC) प्रीती सुरेश पटले असे या तरुणीचे नाव आहे. प्रीतीने कशा पद्धतीने हे यश संपादन केले आहे. तीला हे करताना काय अडचणी आल्या या सर्वांबाबत ईटीव्ही भारतने तीच्याशी बातचीत केली आहे.

प्रीती सुरेश पटले 'पीएसआय'ची परीक्षा उत्तीर्ण झाली. या यशाबद्दल तीच्याशी ईटीव्ही भारतने संवाद साधला आहे

गोंदिया शहराच्या कुडवा परिसरात चहाचे दुकान - इच्छाशक्ती, आत्मविश्वास व कष्ट घेण्याची तयारी असली कुणीही आपले यश गाठवू शकते अशी प्रतीक्रीया प्रीतीने बोलताना दिली आहे. (MPSC pass Preeti Patle) गोंदिया शहराच्या कुडवा परिसरात राहणारे सुरेश पटले, यांची ही मुलगी आहे. सुरेश यांचे गोंदिया शहराच्या कुडवा परिसरात चहाचे दुकान आहे. त्यांनी आपल्या दोन मुलींना आणि एका मुलाला उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले आहे. प्रितीने देखील आज आई वडिलांच्या सहकार्यांने उच्च शिक्षण घेऊन पी.एस.आय होण्याचा मान मिळवत स्वप्न पुर्ण केले आहे.

गोंदिया जिल्यातून उत्तीर्ण झालेली एकमेव तरुणी - प्रीती 2017 साली स्पर्धा परीक्षेकडे वळली (2019)मध्ये घेण्यात आलेल्या (MPSC)च्या परीक्षेत पास झाल्याची माहिती प्रीतीला दोन दिवसांपुर्वी (२५मार्च)ला आलेल्या निकालामध्ये कळवले. प्रीतीने मुलींच्या ओबीसी प्रवर्गातुन राज्यात १७ वा क्रमांक मिळविला आहे. (2019)मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत ती गोंदिया जिल्यातून उत्तीर्ण झालेली एकमेव तरुणी आहे.

स्पर्धा परीक्षेचे वातावरण नसल्याने अभ्यासासाठी अडचण - प्रीतीचे शिक्षण एम. ए (राज्यशास्त्र), डी, एड झाले असून तिने बी. ए. ची पदवी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून सपांदन केली आहे. (MPSC pass Preeti Patle interacted with ETV) शिक्षणानंतर ती एका खाजगी कंपनीत नोकरी करू लागली. घरी दीड एकर शेती असल्याने शेतीच्या व घरच्या कामालाही हातभार लावायची. मात्र, आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे. या उद्देशाने तिने (2017)मध्ये नोकरी सोडून (MPSC)च्या परीक्षेची तयारी सुरु केली. शहरात स्पर्धा परीक्षेचे वातावरण नसल्याने अभ्यासासाठी अडचण झाली. मात्र, त्यावर मत करीत उपलब्ध साधनांसह परीक्षेची तयारी सुरु ठेवली. त्यावर तीने हे यश संपादन केले आहे.

हेही वाचा -Sanjay Raut On BJP : मेहबुबा मुफ्ती भाजपच्या चांगल्या मैत्रिण; संजय राऊतांची फटकेबाजी

ABOUT THE AUTHOR

...view details