महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना - जिल्हाधिकारी बलकवडे

जिल्ह्यात या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून जिल्ह्यातील कोणताही व्यक्ती या विषाणूने बाधित होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.

gondia district collector on corona
नडॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हाधिकारी, गोंदिया

By

Published : Apr 18, 2020, 8:45 AM IST

गोंदिया- संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. देशात, राज्यात आणि जिल्ह्यात देखील कोरोना विषाणूचा संसर्ग पोहोचला आहे. जिल्ह्यात या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून जिल्ह्यातील कोणताही व्यक्ती या विषाणूने बाधित होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा सुरू आहे. गर्दी टाळण्यासाठी घरपोच सेवेच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यात येत आहे. नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांच्यामार्फत 24 तास नियंत्रण कक्ष व व्हाट्सअप हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आले आहे.

नडॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हाधिकारी, गोंदिया
जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य विषयक विविध शंकांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषद गोंदिया येथे 24 तास डॉक्टरांची सेवा हेल्पलाइनच्या माध्यमातून जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. गोंदिया येथील गणेशनगर भागात पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्यामुळे तो भाग प्रतिबंधित क्षेत्र आहे. सदर भाग हा रुग्णाला दवाखान्यातून सुट्टी झाल्यापासून 28 दिवस म्हणजे 8 मे 2020 पर्यंत पूर्णपणे प्रतिबंधित राहणार आहे. तसेच त्या रुगणाला 14 दिवस घरीच अलगिकरणात राहणे गरजेचे आहे. गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी 11 एप्रिल रोजी इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार माइल्ड, मॉडरेट व सिवियर या कोरोना संशयित रूग्णांसाठी किंवा लक्षणे असलेला नागरिकांसाठी कोविड केअर सेंटर- 677 खाटा, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर- 580 खाटा व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल-100 खाटांचे उभारण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या अनुषंगाने 251 नागरिक परदेश प्रवास करून जिल्ह्यात आले. त्यांचा व त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना घरीच अलगीकरण करून ठेवण्यात आले होते. त्यांचा व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा अलगिकरणाचा कालावधी संपला आहे. आतापर्यंत 135 व्यक्तीच्या घशाच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठवण्यात आले होते. त्यामध्ये आठ नागरिकांचे नमुने पुन्हा पाठविण्यात आले. आजपर्यंत सर्वच नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. 126 नमुने निगेटिव्ह, एक नमुना पॉझिटिव्ह व पुन्हा पाठविलेले इतर आठ नमुने निगेटिव्ह आलेले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details