गोंदिया - माता आणि बालमृत्यूवर आळा घालण्याच्या उद्धेशातून शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत मागासलेला जिल्हा पुन्हा आता पहिल्या क्रमांकावर आला आहे. ईटीव्ही भारतने प्रधानमंत्री मातृवंदन सप्ताहात या संदर्भातील बातमी प्रकाशित केली होती. २ डिसेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत हा सप्ताह चालवण्यात आला. या बातमीची दखल घेत जिल्ह्यातील गर्भवती महिलांनी योजनेचा लाभ घेतला. यात जिल्ह्याने या योजनेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत गोंदिया राज्यात अव्वल काय आहे ही योजना?
या योजनेंतर्गत गर्भवती तसेच प्रसुतीनंतर प्रसुता आणि नवजात बाळाला पोषक आहार देता यावा, यासाठी 5 हजार रूपयांची आर्थिक मदत दिली जाते. यात गर्भावस्थेत नाव नोंदणी केल्यास 1 हजार रूपयांची पहिली किश्त, गर्भावस्थेच्या ६ महिन्यानंतर आणि प्रसुतीच्या पूर्वी 2 हजार रूपयांची दुसरी किश्त तसेच बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याची नोंदणी तसेच लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर 2 हजार रूपयांची तिसरी किश्त दिली जाते.
हेही वाचा -नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून विद्यार्थिनीने नाकारले सुवर्णपदक!
नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्याने गोंदियाला मागे ठेवले होते. आरोग्य विभागानुसार, प्रधानमंत्री मातृवंदन योजनेंतर्गत जानेवारी २०१७ ते १७ डिसेंबर २०१९ पर्यंत २७ हजार ७३९ महिलांना लाभ देण्यात आला होता. जिल्ह्यात आतापर्यंत २६ हजार २५६ म्हणजे ९४.६५ टक्के महिलांना लाभ देण्यात आला. नोव्हेंबर महिन्यात लाभार्थी महिलांची आकडेवारी २५ हजार ४३८ म्हणजे ९१.१७ टक्के होती. लाभार्थ्यांत तिरोडा तालुक्यात 3 हजार २१५, गोंदियातील 6 हजार २७८, सडक अर्जुनीतील 2 हजार २१४, गोरेगावातील 2 हजार ५५२, सालेकसातील 1 हजार ८९८, अर्जुनी मोरगावातील 2 हजार ९५०, आमगावातील 2 हजार ५४६, देवरीतील 2 हजार २७१, गोंदिया शहरातील 1 हजार ९९४ आणि तिरोडा शहरातील ३३८ लाभार्थ्यांचा समावेश आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यात ‘करेक्शन क्यु’ मध्ये 1 हजार १५६ महिलांचा समावेश आहे.
हेही वाचा -बारावीमध्ये 51 टक्के गुण मिळवणारा प्रसाद बनला 'न्यायाधीश'
मात्र, मातृवंदन सप्ताहात ‘करेक्शन क्यु’ संपविण्यात आली. त्यामुळे आता ‘करेक्शन क्यु’ची आकडेवारी ७४० झाली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना आतापर्यंत १० कोटी ८४ लाख ५९ हजार रूपयांचा लाभ देण्यात आला आहे. नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्याने गोंदियाला मागे ठेवले होते. मात्र, आता गोंदिया जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. भंडारा जिल्हा पूर्वी प्रथम क्रमांकावर होता. वर्धा तिसऱया तर नागुपर आणि चंद्रपूर चौथ्या तसेच गडचिरोली जिल्हा आठव्या क्रमांकावर होता.