गोंदिया -विहीर बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी १५०० रुपयांची लाच घेताना, रंगेहाथ पकडलेल्या पंचायत समितीच्या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत, 4 वर्षांचा कारावास आणि 5 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. ओमप्रकाश चुन्नीलाल डहाट असे या आरोपी अभियंत्याचे नाव आहे.
4 वर्षांचा कारावास
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एमआरईजीएस योजनेंतर्गत तक्रारदाराला मंजूर झालेल्या विहिरीच्या बांधकामाचे बिल तयार करून देण्यासाठी, आरोपी अभियंता चुन्नीलाल डहाट याने 15 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने याची माहिती लाचलुचपत प्रतिबंध विभागाला दिली. मिळालेल्या माहितीनुसार या लाचखोर अभियंत्याला पंचासमोर लाच स्वीकारताना 7 ऑगस्ट 2015 साली अटक करण्यात आली होती. दरम्यान न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत 4 वर्षांचा कारावास आणि 5 हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास आणखी दोन महिने कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा -वाझेच्या खासगी वाहन चालकाने अँटिलियाजवळ लावली होती 'ती' मोटार