महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदिया : केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे धरने आंदोलन - केंद्र सरकारविरोधात आंदोलन गोंदिया

नरेंद्र मोदी यांनी नुकताच पंतप्रधान पदाचा सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. याविरोधात गोंदियामध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कमिटीच्या भोला भवनसमोर हे आंदोलन करण्यात आले असून, यावेळी कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे धरने आंदोलन
केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे धरने आंदोलन

By

Published : May 30, 2021, 6:09 PM IST

गोंदिया - नरेंद्र मोदी यांनी नुकताच पंतप्रधान पदाचा सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. याविरोधात गोंदियामध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कमिटीच्या भोला भवनसमोर हे आंदोलन करण्यात आले असून, यावेळी कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे धरने आंदोलन

केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

या सात वर्षांच्या कार्यकाळात मोदींनी देशाला भकास केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी हातात केंद्र सरकारविरोधी फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. मोदी सरकारला सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. मात्र या सात वर्षांच्या काळात मोदी सरकार कोरोना, आर्थिक स्थिती, नोटबंदी, रोजगार, शेती अशा सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याची टीका यावेळी नामदेव किरसान यांनी केली आहे. दरम्यान आजचे काँग्रेसचे हे आंदोलन रस्त्याच्या कडेला होणार होते, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने हे आंदोलन भोला भवनसमोर करण्यात आले.

हेही वाचा -सर्वस्व गमावलेला मच्छिमार दोन वर्षापासून 'त्या' वादळाचा सरकारी दफ्तरी घेत आहे शोध

ABOUT THE AUTHOR

...view details