गोंदिया -सर्वात जवळचे माझे गुरू मुकुल पाठक सर आहे. त्यांनी मला यूपीएससीला शिकवले. मी तयारी करत असताना त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. तू करू शकतेस, असे ते मला नेहमी सांगत. त्यामुळेच आज मी जिल्हाधिकारी बनू शकले, असे गोंदियाच्या जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.
तस्मै श्री गुरवे नमः : ...म्हणून मी जिल्हाधिकारी होऊ शकले - डॉ. कादंबरी बलकवडे - गुरुपौर्णिमा महत्व
आज गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्त आम्ही तुमच्यासाठी 'तस्मै श्री गुरवे नमः' ही सिरीज घेऊन आलो आहोत. त्याद्वारे गोंदियाच्या जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरूबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
![तस्मै श्री गुरवे नमः : ...म्हणून मी जिल्हाधिकारी होऊ शकले - डॉ. कादंबरी बलकवडे gurupournima special gurupournima importance dr kadambari balkawade on gurupournima gondia collector dr kadambari balkawade गोंदिया जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे गुरुपौर्णिमा महत्व गुरुपौर्णिमेबाबत डॉ. कादंबरी बलकवडे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7887800-thumbnail-3x2-asas.jpg)
प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूंचे स्थान महत्वाचे असते. लहानपणापासून आपल्याला वेगवेगळ्या वळणावर गुरू भेटतात. त्यांच्यामुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळत असते. गुरूंमुळे आपले आयुष्य बदलून जाते. माझ्या जीवनात देखील असेच दोन गुरू आहेत. पहिले म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेताना डॉ. संदीप पुरी हे माझे गुरू आहेत. मी आताही त्यांच्या संपर्कात आहे. त्यांनी मला फक्त विषयच शिकवला नाही, तर जीवन कसे जगायचे? हे शिकवले. त्यानंतर माझ्या आयुष्यात सर्वात महत्वाचे स्थान आहे, ते मुकुल पाठक सरांना. त्यांनी मला यूपीएससीला शिकवले आणि आजही मी त्यांच्याकडून शिकत असते, असे जिल्हाधिकारी बलकवडे म्हणाल्या.