महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एसटी महामंडळाचे जिल्हा परिषदेकडे ९ लाख थकीत; २०१५ च्या निवडणुकीतील रक्कम - 9 lakh overdue 2015 election

जिल्हा परिषदेचे अधिकारी ९ लाख रुपयाचे बिल काढून द्यायला तयार नसल्याने आगारातील अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या चकरा माराव्या लागत आहेत. याबाबत जि.प. प्रशासनाशी संपर्क साधला असता कुणीही बोलायला तयार नाही.

एसटी महामंडळाचे जिल्हा परिषदेकडे ९ लाख थकीत
एसटी महामंडळाचे जिल्हा परिषदेकडे ९ लाख थकीत

By

Published : Mar 13, 2020, 7:55 AM IST

गोदिंया - २०१५ साली निवडणुकांसाठी गोंदिया आगाराकडून जिल्हा परिषदेला बसेस पुरविल्या होत्या. यासाठीचे महामंडळाचे तब्बल ९ लाख रुपये जिल्हा परिषदेने थकवले आहेत. मात्र, आगाराकडून जिल्हा परिषदेला पाठपुरावा करूनही मागील पाच वर्षांपासून ही रक्कम जिल्हा परिषदेने चुकती केली नाही. थकीत रक्कमेमुळे गोंदिया आगार संकटात सापडले आहे.

एसटी महामंडळाचे जिल्हा परिषदेकडे ९ लाख थकीत

गोंदिया जिल्हा परिषदेवर भाजप-काँग्रेसची सत्ता असून एकाच वर्षी या जिल्हा परिषदेत दोन सभापतींना लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले होते. लाचखोरी म्हणा किंवा कामचुकारीपणा अशा अनेक कारणांनी जिल्हा परिषद नेहमीच चर्चेत असते. आता तर वेगळ्या कारणाने जिल्हा परिषद चर्चेत आली असून तब्बल पाच वर्षांआधीची गोंदिया आगाराची थकित रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा -जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून एकाची हत्या

आगाराकडून ९ लाख रुपये देण्याची मागणी करूनही जिल्हा परिषद प्रशासन तोंडावर बोट ठेवून काहीच बोलायला तयारच नाही. आगाराने स्वतःच्या खिशातून बसेसमध्ये इंधन घातले. परंतु, आता जिल्हा परिषदेचे अधिकारी ९ लाख रुपयाचे बिल काढून द्यायला तयार नसल्याने आगारातील अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या चकरा माराव्या लागत आहेत. याबाबत जि.प. प्रशासनाशी संपर्क साधला असता कुणीही बोलायला तयार नाही.

हेही वाचा -विद्यार्थ्यांनी केली कोरोनाची प्रतिकात्मक होळी

ABOUT THE AUTHOR

...view details