गोंदियारायपुरकडून नागपुरच्या दिशेने जाणाऱ्या भगत की कोठी Bhagat Ki Kothi ट्रेनला गोंदिया शहरालगत अपघात Train Accident झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी समोरून जात असलेल्या मालगाडीला भगत की कोठी ट्रेन ने मागून धडक दिल्याचं वृत्त समोर येत आहे. या अपघातानंतर या ट्रेनचा एक डब्बा रुळाखाली घसरला. सुत्रांच्या माहितीनुसार या ट्रेनच्या अपघातात 50 हून अधिक लोक किरकोळ जखमी झाल्याचं समजत आहे. जखमी प्रवाशांवर जिल्हा सामान्य रुग्णालय व तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान ही घटना आज पहाटे 4 वाजता घडल्याचं सांगण्यात येत आहे. माहितीनुसार या अपघातात 53 लोक किरकोळ जखमी तर 13 जणांना थोडा मार लागला आहे.
या कारणामुळे अपघात झाल्याची शक्यता ? -मालगाडीला 'भगत की कोठी' ट्रेन ने दिली मागून धड़क दिली, तेव्हा ट्रेनचा एक S3 डब्बा रुळाखाली घसरला आहे. अपघातात 53 च्या वर लोक जखमी तर 13 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. एकाच ट्रॅकवर 2 ट्रेन नागपूरच्या दिशेने जात होत्या, 'भगत की कोठी' ट्रेनला ग्रीन सिग्नल मिळाल्याने ही गाडी समोर निघाली होती. मात्र या रुळावर मालगाडी समोर चालत असताना गोंदिया शहराला लागून असलेल्या रेल्वे गेटवर सिग्नल व्यवस्थित न मिळाल्याने भगत कोठी ही ट्रेन मालगाडीला धडकली अशी माहिती मिळाली आहे.