महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जंगलपरिसरात मुलीचा संशयास्पद मृतदेह आढळला

मुलीच्या हत्येची ही घटना 4 ते 6 दिवसांपूर्वीच झाली असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. मृतदेहावरुन ही फक्त हत्या नाही, तर आधी बलात्कार करुन नंतर हत्या केली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

जंगलपरिसरात मुलीचा संशयास्पद मृतदेह आढळला

By

Published : Nov 9, 2019, 12:58 AM IST

गोंदिया - जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील खैरी सुकळी - गोठणगाव मार्गावरील काळीमाती घनदाट जंगलात 18 ते 20 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. ही घटना 7 नोव्हेंबरला सायंकाळी 7 च्या दरम्यान उघडकीस आली आहे. मृतदेहावरुन ही फक्त हत्या नाही, तर आधी बलात्कार करुन नंतर हत्या केली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

अर्जुनी मोरगाव पोलीस या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मुलीच्या हत्येची ही घटना 4 ते 6 दिवसांपूर्वीच झाली असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे.

अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन

घटनास्थळी पंचनामा केला असता गुलाबी रंगाचा सलवार, पिवळी लेगीन्स, जुती, कानातले झुमके आणि इतर साहित्य आढळून आले आले. ८ नोव्हेंबरला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास अर्जुनी मोरगाव पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details