गोंदिया -आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथील चोरीच्या गुन्हात अटक केलेल्या आरोपी राजकुमार अभयकुमार धोती (30) याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. हे प्रकरण सी.आय.डी.च्या ताब्यात देण्यात आले होते. शवविच्छेदन अहवालानंतर व सी.आय.डी. तपासानंतर त्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक महावीर जाधव हे पसार होते. अखेर त्याला मंगळवारी अटक करण्यात आले. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडीत देण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण -
सविस्तर वृत्त असे की राजकुमार अभयकुमार धोती सह सुरेश धनराज राऊत, राजकुमार गोपीचंद मरकाम व एक अल्पवयीन आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने २० मे ला अटक केली होती. व २१ मे ला स्थानिक गुन्हे शाखेने आमगाव पोलीस ठाणेला सदर आरोपींना सोपविले होते. त्यापैकी एका आरोपीचा आमगाव ठाणे पोलीस कोठडीत (२२ मे) ला सकाळी ५ वाजता राजकुमार अभयकुमार धोती संशयास्पद मृत्यू झाले होते. या प्रकरणाच्या चौकशीनंतर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी प्राथमिक तपासणी करून पोलीस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, व दोन पोलीस शिपाई यांना तडकाफडकी निलंबित केले होते.