गोंदिया- किरकोळ कारणावरून झालेल्या जुन्या वादाच्या रागातून दोन मित्रांनी एका अल्पवयीन मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. शहरातील मनोहर चौकात असेलेल्या एका चायनिज फुड विक्रीच्या दुकानाजवळ शनिवारी रात्री 8 च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली आहे. कान्हा शर्मा(१७) असे मृत युवकाचे नाव आहे.
गोंदियात मैत्रीच्या नात्याला कलंक; धारदार चाकूने मित्राची निर्घृण हत्या - मित्रांनीच केला मित्राचा खुन गोंदिया बातमी
कान्हा आणि आरोपी हे तिघे मित्र एक वर्षापूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात नाचत होते. त्यावेळी आरोपीचा हात लागल्याने कान्हाने रागाच्या भरात एका आरोपीच्या कानाखाली मारली होती. त्याचाच राग मनात ठेवत त्या घटनेचा शनिवारी रात्री सूड उगवला.
कान्हा आणि आरोपी हे तिघे मित्र एक वर्षापूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात नाचत होते. त्यावेळी आरोपीचा हात लागल्याने कान्हाने रागाच्या भरात एका आरोपीच्या कानाखाली मारली होती. त्याचाच राग मनात ठेवत त्या घटनेचा शनिवारी रात्री सूड उगवला. त्याने त्याच्या मित्राच्या सहाय्याने मनोहर चौकात शामला एकटे गाठले आणि त्याच्यावर चाकूने वार केले. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर उपस्थितांनी गंभीर जखमी झालेल्या कान्हाला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. एक वर्षापूर्वी कान्हाने अनेकजणांच्या उपस्थितीत आरोपीवर हात उचलला होता. त्याचाच राग मनात धरून ही हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात कलम ३०२चा गुन्हा दाखल केला आहे.