महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांचा कोरोनाने मृत्यू

राज्यात वेगाने कोरोनाचा प्रादुर्भाव फैलावत आहे. समाजाच्या सर्वच स्तरातील नागरिकांना कोरोनाने आपला विळखा घातला आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांचाही आज कोरोनाने मृत्यू झाला.

Corona Death
कोरोना मृत्यू

By

Published : Sep 13, 2020, 7:08 PM IST

गोंदिया - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मृत्यूमुळे गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

काल संध्याकाळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षांना गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा त्रास आणि न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले होते. मागील आठवड्यात त्यांनी कोरोना तपासणी करून घेतली होती मात्र, तेव्हा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. काल त्यांची पुन्हा चाचणी केली होती. त्याचा अहवाल येण्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर आलेला अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांचे पती देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्याच्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मृत माजी जिल्हा परिषद अध्यक्षांनी २०१५ मध्ये राजकारणात प्रवेश करत गोंदिया तालुक्यातील फुलचूर क्षेत्रातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांनी विजय मिळवत अडीच वर्ष सदस्य म्हणून काम पाहिले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने त्यांची जिल्हा परिषदेत अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. ३१ जुलैला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्या पदमुक्त झाल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details