महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुलगा आणि सुनेला विजेचा शॉक लागल्याचे कळताच माजी नगराध्यक्षाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष गोविंद शेंडे यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यु झाला आहे. मुलगा आमि सुनेला विजेचा शॉक लागल्याचे कळताच गोविंद यांना हृदय विकाराचा तिव्र झटका आला आणि ते जागीच गतप्राण झाले.

मुलगा आणि सुनेला विजेचा शॉक लागल्याचे कळताच माजी नगराध्यक्षाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यु

By

Published : Aug 26, 2019, 6:40 PM IST

गोंदिया - नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष गोविंद शेंडे यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मुलगा आमि सुनेला विजेचा शॉक लागल्याचे कळताच गोविंद यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते जागीच गतप्राण झाले.

मुलगा आणि सुनेला विजेचा शॉक लागल्याचे कळताच माजी नगराध्यक्षाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यु

शेंडे यांची सून घरामागे वाळत घातलेले कपडे काढत असताना तिला विजेचा शॉक लागला. सचिन शेंडे हे पत्नीला वाचवण्यासाठी गेले असता त्यांनादेखील शॉक लागला. आवाज ऐकूण गोविंद तिथे गेले असता त्यांना मुलगा आणि सून जमिनीवर पडलेले आढळले. हे दृश्य पाहून त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, गोविंद शेंडे यांचा मुलगा आणि सूनेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. शहरातील नेतेमंडळींसह नागरिकांनी शेंडे यांच्या घरी गर्दी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details