महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सट्टा व्यावसायिकाकडून १० हजारांची लाच घेणारा पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात - गोंदीया लेटेस्ट न्यूज

शहर जुगार व सट्टा व्यावसायिकाकडून लाच स्विकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी लाचलुचपत विभागाच्या पथकाने पाचे यांच्या घराची तपासणी सुरू केली आहे.

लाच घेताना राजकुमार पाचे एसीबीच्या जाळ्यात

By

Published : Oct 26, 2019, 11:44 AM IST

गोंदिया -शहर जुगार व सट्टा व्यावसायासाठी प्रसिध्द आहे. या व्यावसायाला पोलीस विभागातील काही कर्मचाऱ्यांमुळे अधिक पाठवळ मिळाल्याचे चित्र नवे नाही. गोंदियातील मातटोली परिसरातील मढी भागात नमकीन हॉटेलच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षान सट्टापट्टी चालवण्याचा धंदा करत असलेल्या एका व्यक्तीकडून स्थानिक गुन्हे शाखे शाखेचा शिपाई राजकुमार पाचे यांनी मासिक हप्त्याच्या रुपात २ हजार रुपये मिळायचे. मात्र, गेल्या चार महिन्यापासून तो हप्ता दुकान बंद असल्याने हरवडे नामक व्यक्तीने देणे बंद केले होते. यानंतर आक्टोंबर २०१९ मध्ये पुन्हा व्यवसाय सुरू केल्याची माहिती मिळताच त्यांनी २३ ऑक्टोबरला सायकांळच्या सुमारास हॉटेलवर पोचून प्रतिमहिना १० हजाराची मागणी केली. मात्र, तक्रारदारास पोलीस हवालदार राजकुमार पाचेला याला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली. त्या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत विभागाने राजकुमार हारोडी नमकीन शॉप येथे त्यांला लाच स्विकारतांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. पाचे याच्या विरुध्द गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाच्या पथकाने पाचे याच्या घराची तपासणी सुरु केली आहे.

लाच घेताना राजकुमार पाचे एसीबीच्या जाळ्यात

विशेष म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा गोंदियात राज्यस्तरीय फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या सामन्याच्या सुरु होण्याच्या आदल्या दिवशी सिव्हीललाईन स्थित हिरू नामक एका सट्टाव्यवसायीकाकडे सुध्दा धाड घालण्यात आली होती. त्या धाडी दरम्यान सुध्दा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची चर्चा बाजारात होती. पाचे यांचे गोंदिया शहरातील सट्टाव्यवसायीकाशी संबध असून त्याला स्थानिक गुन्हे शाखेतीलच एक तीन अक्षरी नाव असलेला व दोन अक्षरी आडनाव असलेला एक सहकारी यात पुर्ण सहकार्य करत असल्याचे बोलले जाते. स्थानिक गुन्हे शाखेतील काही कर्मचाऱ्यांचे या सट्टाव्यवसायिकांशी चांगले संबध असून गेल्या अनेक वर्षापासून पोलीस विभागातील वरिष्ठांना या कर्मचाऱ्यांमार्फत भेट पोचते करण्यात येत असल्याची चर्चा आहे. सखोल चौकशी केल्यास मोठा घबाड समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोंदियातील सट्टाव्यवसायीक हे पोलिसांच्या छत्रछायेतच गोरखंधंदा चांगल्याने करीत असल्याने त्यांना कुणाची भिती राहिली नाही. मात्र, या प्रकरणामुळे पोलीस व सट्टाव्यवसायीकांचे गुप्त असलेले संबध उघडकीस आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details