गोंदिया - दिवाळी तोंडावर आली असली तरी गोंदिया जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र न उघडल्याने धान्य कुठे विकायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यां विचारले असता, मी धान्य खरेदी केंद्र सुरू करण्याची परवागी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला दिली आहे. ते बोलायला तयार नसतील तर मीही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरवर्षी १ ऑक्टोबर ते ३१ मार्च या कालावधीत धान्य खरेदी केंद्र खुले असण्याचा शासन आदेश काढाला जातो. या वर्षी एक महिना उशीर झाला, तरी शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र उघडले नाही. दिवाळी तोंडावर आली असताना यावर्षी आधारभूत धान्य खरेदी केंद्र न उघडल्याने धान्य कुठे विकावे, कर्ज कसे फेडावे, मजुरांना पैसे कुठून द्यावे, असा प्रश्न शेतकाऱ्यांना पडला आहे. येत्या दोन दिवसांत आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरु करावे, अशी मागणी शेतऱ्यांनी केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांची दिवाळी या वर्षी अंधरात असणार असल्याचे बोलत आहे. या संदर्भात जिल्हा मार्केटींग फेडरशनच्या अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता, धान्य खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी नवीन बदल करण्यात आले आहे. धान्य खरेदी केंद्राला मंजुरी देण्यात आली असली तरी, प्रत्यक्षात अजून ५ दिवसांनंतर धान्य खरेदी सुरु केले जाईल, अशी माहिती या अधिकऱ्यांनी दिली आहे.