महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना नियमाचे पालन करीत शिवभक्तांनी घेतले प्राचीन नागराधाम येथील बमबम भोलेचे दर्शन - महाशिवरात्री बद्दल बातमी

दरवर्षी या नागराधाम येथे महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विविध भागातील भाविक मोठ्या प्रमाणात या मंदिरात गर्दी करून,'बम बम भोले' च्या गजराने परिसर दुमदूमन निघत असतो. मात्र, कोरोना नियमाचे पालन करीत शिवभक्तांनी प्राचीन नागराधाम येथील बमबम भोलेचे दर्शन घेतले.

Following the Corona rules, Shiva devotees visited the Shivalinga at the ancient Nagradham
कोरोना नियमाचे पालन करीत शिवभक्तांनी घेतले प्राचीन नागराधाम येथील बमबम भोलेचे दर्शन

By

Published : Mar 11, 2021, 4:49 PM IST

Updated : Mar 11, 2021, 5:13 PM IST

गोंदिया -कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रसासनाने महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या सर्व यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, गोंदिया जिल्ह्यातील नागरा येथील प्राचीन पंचमुखी मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करून पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेतले.

कोरोना नियमाचे पालन करीत शिवभक्तांनी घेतले प्राचीन नागराधाम येथील बमबम भोलेचे दर्शन

दरवर्षी या नागराधाम येथे महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विविध भागातील भाविक मोठ्या प्रमाणात या मंदिरात गर्दी करून,'बम बम भोले' च्या गजराने परिसर दुमदूमन निघत असतो. मात्र, यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता याठीकाणी भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाविक दर्शन घेणार असल्याने मंदिर आज खुले करण्यात आले आहे. मात्र, गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश नाकारण्यात आला असून भाविक दुरूनच पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेत आहे.

नागरधाम या मंदिराची वास्तू दगडात बांधलेली आहे. अत्यंत मनमोहक असे या मंदिराचे बांधकाम आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गीताप्रेस गोरखपूर येथे प्रकाशित होणाऱ्या मासिक १९५१ पत्रिकेमध्ये या मंदिराचा उल्लेख केला आहे. यावरून हे मंदिर किती प्राचीन आहे हे लक्षात येते.

Last Updated : Mar 11, 2021, 5:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details