महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दौरे थांबवा, मदत द्या : गोंदियातील शेतकऱ्यांना दीड महिना लोटूनही मदत नाही - गोंदिया महापूर

गोंदिया जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक आले, पश्चिम महाराष्ट्रापासून ते स्थानिक पातळीवरील मंत्री आणि नेत्यांनी दौरे केले. तात्काळ मदतीचे आश्वासनही दिले. मात्र दीड महिना लोटून देखील एकाही शेकऱ्याला आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे यंदाची शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जाणार आहे.

अधिकाऱ्यांचे दौरे
अधिकाऱ्यांचे दौरे

By

Published : Oct 21, 2020, 10:33 AM IST

गोंदिया - जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटी महापूर आला. यात तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील १८ गावांना फटका बसला. महापुरामुळे शेतातील संपूर्ण पीक उध्वस्त झाले. नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक आले, पश्चिम महाराष्ट्रापासून ते स्थानिक पातळीवरील मंत्री आणि नेत्यांनी दौरे केले. तात्काळ मदतीचे आश्वासनही दिले. मात्र, दीड महिना लोटून देखील एकाही शेकऱ्याला आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे यंदाची शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जाणार आहे.

गोंदियातील शेतकऱ्यांना दीड महिना लोटूनही मदत नाही

गोंदिया तालुक्यातील कासा या गावात संदीप तिवारी शेतकरी आहे. त्यांच्याकडे ५० एकर शेती आहे. महापुरामुळे ४९ एकर शेतीवरील पीक नष्ट झाले. यात तिवारी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शिवाय बँकेचे कर्ज आता भरायचे कसे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सरकार संपूर्ण नुकसानीचा मोबदला देणार नसले तरी तात्काळ काही प्रमाणात आर्थिक मदत करेल, या आशेवर त्यंच्यासह इतरही शेतकरी होते. मात्र या आशेवरही सरकारने पाणी फेरले. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात रोष दिसून येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्यात दौरा केला. मात्र पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांच्या व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही. शिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी देखील पाहणी केली नाही. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांविषयी गंभीर आहे का?, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details