गोंदिया- जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती दिली आहे. तरीही मध्यप्रदेश व छत्तीसगड येथे झालेल्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग होऊन जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ढिवरटोला हे गाव पूर्णतः पाण्याखाली गेले होते. या गावातील आतापर्यंत १०६ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर पुरामुळे हजारो हेक्टर जमीनही पाण्याखाली गेली आहे.
गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती कायम; १०६ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश - sanjay lake
मध्यप्रदेश व छत्तीसगड येथे झालेल्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग होऊन जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातील ढिवरटोला हे गाव पूर्णत: पाण्याखाली गेले आहे. मात्र या गावातील १०६ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले.
गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती
संजय सरोवर या जलाशयातून सोडलेल्या पाण्यामुळे वैनगंगा नदीला पूर येऊन नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या अनेक गावांचा संपर्क तुटून गावं जलमय झाले आहेत. परंतू, जिल्ह्यात पूरस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली आहे.