गोंदिया- जिल्ह्यात कोरोनाने आता पाय पसरायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 5 नवे रुग्ण आढळले आहेत. या नवीन रुग्णांसह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३५ वर गेली आहे.
गोंदियात कोरोनाबाधितांची संख्या ३५ वर, प्रशासनाची चिंता वाढली - गोंदिया कोरोना पेशंट
गोंदियात गेल्या २४ तासात पाच नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या रुग्णांसह गोंदियात बाधित रुग्णांचा आकडा ३५ झाला आहे.
गोंदियात कोरोनाबाधितांची संख्या ३५वर, वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढवणारी
या ३५ रुग्णांपैकी एक जण बरा झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे. तर ३४ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. फक्त दोन दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत झालेली दोनअंकी वाढ जिल्हा प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनली आहे. मोठ्या संख्येने कामगार, मजूर, विद्यार्थी व नागरिक परराज्यातून परत आपल्या जिल्ह्यात परतत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती आहे.