गोंदिया - पूर्व विदर्भाच्या गोंदिया जिल्ह्यात पहिल्यांदाच O+VE बॉम्बे रक्तगटाचा रुग्ण आढळला आहे. मात्र, या रक्त गटाच्या रुग्णाला रक्त लागत असल्याने चक रक्तदान करण्यासाठी थेट नांदेड जिल्ह्यातून तरुणाने दुचाकी वाहनाने गोंदिया गाठत त्या रुग्णाला रक्तदान केले आहे. तब्ब्ल २० ते ४० लक्ष लोकांमध्ये हे O+VE बॉम्बे रक्तगट एखाद्या व्यक्तीमध्ये आढळतो. संपूर्ण भारत देशात या रक्तगटाचे २२० लोक सध्या आहेत. (donated blood while traveling from Nagpur to Gondia) तर, एकट्या महाराष्ट्रात ५० च्या वर या O +VE बॉंम्बे रक्त गटाच्या लोकांचा समावेश आहे. १९५२ साली मुबई येथील डॉ. वाय. एम. भेंडे यांनी या रक्त गटाचे शोध लावले होते. हे नक्की काय आहे याबाबत ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे.
हा रक्त गट अंत्यत दुर्लब आहे
गोंदिया येथे एका खाजगी रुग्णालयात विनोद रामटेककर विनोद यांना मूत्र पिंडाचा आजार असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना रक्ताची गरज भासल्याने त्यांच्या रक्ताचे नमुने गोंदियातील लोकमान्य टिळक प्रयोग शाळेत पाठविले असता त्या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. (First O + VE Bombay blood group) ती म्हणजे विनोद यांचे रक्त गट हे O +VE बॉम्बे रक्त गट आहे. हा रक्त गट अंत्यत दुर्लब असल्याने लोकमान्य टिळक रक्तपेढीने मुंबई येथील मैत्री फाउंडेशनच्या मदतीने O +VE बॉम्बे रक्त गट असलेल्या व्यक्तीचा शोध घेतला असता तो व्यक्ती नांदेड जिल्यातील असून त्याचे नाव माधव सुवर्णकार (वय, 36) असे आहे.