गोंदिया- शहरात लहान मुलाच्या भांडणावरुन झालेल्या वादातून तरुणाने गोळीबार केल्याची घटना घडली. यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला आहे. शहरातील दुर्गा चौक परिसरातील भालाधरे वाईन शॉपजवळ शुक्रवारी रात्री ८ ते ९ च्या सुमारास ही घटना घडली.
लहान मुलांच्या भांडणावरून गोंदियात गोळीबार - fight
गोंदिया शहरात लहान मुलाच्या भांडणावरुन झालेल्या वादातून तरुणाने गोळीबार केल्याची घटना घडली.
या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव शिव यादव (वय ४५, रा. सरकारी तलाव) आहे. जखमी शिव यादव यांच्या मुलाचे आरोपी नीरज गुरुदास वाधवानी (वय ४७) यांच्या मुलासोबत भांडण झाले होते. २ दिवसापूर्वी यामुळे शिव यादवने आरोपीच्या मुलाला चापट मारली होती. याबाबत मुलाने त्याच्या वडिलांना सांगितले. त्यावेळी आरोपी वाधवानींनी मनात राग धरून शिव यादववर गोळी झाडली. यामध्ये यादव यांच्या हाताला गोळी लागली.
यामध्ये यादव जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी वाधवानीला घेऊन त्याच्याकडील बंदूक जप्त केली आहे.