गोंदिया -आमगाव तालुक्यातील किडंगीपारमध्ये शेतात मळणीसाठी काढून ठेवलेल्या पिकाला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत शेतातील हरभरा, तूर आणि लाखोळीचे पीक जळून खाक झाले असून, शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान ही आग कोणी तरी जाणीवपूर्वक लावल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.
अज्ञात व्यक्तीकडून पिकाला आग आगीच्या घटनेत शेतकऱ्याचे 50 हजारांचे नुकसान
शेतकरी लक्ष्मण बिहारीलाल मुनेश्वर यांनी आपल्या शेतातील हरभरा, तूर आणि लाखोळीच्या पिकाची कापणी करून, मळणीसाठी त्याचे ढिग तयार केले होते, मात्र सध्या विदर्भात पावसाचे वातावरण असल्याने मळणी लांबणीवर पडली होती. दरम्यान सोमवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने या पिकांच्या ढिगाऱ्याला आग लावली. या आगीत पीक जळून खाक झाले असून, यामध्ये मुनेश्वर यांचे 50 हजारांचे नुकसाने झाले आहे. शेतकऱ्याने याची माहिती तहसीलदारांना दिली असून, घटनेची माहिती मिळताच तहसीलदारांनी घटनास्थळी येऊन, नुकसानीचा पंचनामा केला. तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मुनेश्वर यांनी केली आहे. तसेच आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा -शहीद दिन : हुतात्मा राजगुरुंच्या स्मारकाला सरकारी अनास्थेचा फटक