गोंदिया-तालुक्यातील किन्ही जंगल परिसरातून मोहफुलाची दारू गाळणारी हातभट्टी उपविभागीय पोलीस अधिकारी व त्यांच्या चमुने उद्ध्वस्त केली. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ३१ जुलै रोजी दुपारी ३ च्या सुमारास करण्यात आली.
किन्ही जंगलातून हातभट्टी उद्ध्वस्त चौघांवर गुन्हा दाखल ; १ लाख ५ हजारांचा माल जप्त - दारूची हातभट्टी उद्ध्वस्त चौघांवर गुन्हा दाखल
गोंदिया तालुक्यातील किन्ही जंगलातील नाल्यात अवैधरित्या मोहफुलाची हातभट्टी लावून दारू गाळत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. यानुसार ३१ जुलै रोजी पोलिसांनी छापा टकला आणि त्यात एकूण १ लाख ५ हजार १०० रूपयांचा माल जप्त करून उद्ध्वस्त केला. आरोपी फरार असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
![किन्ही जंगलातून हातभट्टी उद्ध्वस्त चौघांवर गुन्हा दाखल ; १ लाख ५ हजारांचा माल जप्त destroying liquor kiln in forest](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8258724-752-8258724-1596282489518.jpg)
किन्ही येथील राजकपुर रामप्रसाद बंन्सोड, सागर रामकिसन मुलतानी, कृष्णा नानाजी कहनावत, दामा सिंधखोपडे हे किन्ही जंगल परिसरातील नाल्यात अवैधरित्या मोहफुलाची हातभट्टी लावून दारू गाळत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. या माहितीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी जगदिश पांडे व त्यांच्या चमूने घटनास्थळी छापा टाकला.
पोलिसांना पाहुन चारही जण घटनास्थळा वरून पळुन गेले. या दरम्यान घटनास्थळा वरून पोलिसांनी ४ रबरी ट्युबमध्ये भरलेली ८० लिटर दारू, झिल्लीतील १५७५ किलो सडवा मोहापास असा एकूण १ लाख ५ हजार १०० रूपयांचा माल जप्त करून उद्ध्वस्त केला असून आरोपींविरूध्द रावणवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास रावणवाडी पुलिस करत आहे.