गोंदिया- गावाच्या आणेवारीवरून त्या गावातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्याची योजना राज्य शासनाची आहे. मात्र ३३ टक्के आणेवारी असूनसुद्धा शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्याचा प्रकार जिल्ह्यातील खैरी या गावात उघडकीस आलेला आहे. तहसील कार्यालय तसेच स्थानिक जनप्रतिनिधींना ही बाब लक्षात आणून दिली. मात्र, केवळ आश्वासना शिवाय काही मिळाले नाही. त्यामुळे आतातरी पीक विम्याचा लाभ मिळणार काय ? याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा-सकाळपासून अनेकांचे फोन, काँग्रेसमध्ये येण्यास बरेचजण इच्छुक - बाळासाहेब थोरात
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील खैरी हे गाव साधारणतः १५०० च्या आसपास लोकसंखेचे गाव. या गावातील बहुतांश शेतकरी हे धानाची शेती करतात तर काही शेतकऱ्याकडे पाण्याचे साधन असले तरीही बहुतांश शेतकरी, हे कोरडवाहू असल्यामुळे पावसावर अवलंबून आहेत. यंदा जिल्ह्यात पाऊस चांगला असला तरीही मागील दोन हंगामात या गावासह इतर भागात दुष्काळाची परिस्थिती होती. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरलेले धान उगविलेच नाही. तर येथील ४०० ते ५०० शेतकऱ्यांनी पीक विमा देखील काढला होता. या गावाची आणेवारी ३३ टक्के इतकी होती. त्यामुळे पीक विम्याचा लाभ येथील शेतकऱ्यांना मिळेल, अशी आशा होती. दुसऱ्या गावातील शेतकऱ्याला लाभ मिळत गेला मात्र अद्याप दोन महिने लोटून सुद्धा खैरी या गावातील शेतकरी आपल्या पीक विम्यापासून वंचित आहे.
गोंदियातील शेतकरी अजुनही पीक विम्यापासून वंचित हेही वाचा-'आचारसंहिता' म्हणजे नेमकं आहे तरी काय ?
खैरी या गावाची आणेवारी ३३ टक्के असून सुद्धा पीक विम्याचा लाभ मिळत नसल्यामुळे या बाबत येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय तसेच स्थानिक जनप्रतिनिधींना या बाबत विचारणा केली. मात्र आश्वासन शिवाय काही मिळालेले नाही. आता विधानसभा निवडणुका पाहता आचारसंहिता लागल्यामुळे या शेतकऱ्याचा प्रश्न निकाली काढणे आता तरी शक्य नाही. आज अस्मानी संकट पाहता शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. त्यातून त्याला बाहेर काढण्याकरिता राज्य शासनाने पीक विमा हे नवीन धोरण आखले असले तरीही त्याची योग्य प्रकारे अंबलबजावणी होत नसल्याचे उदाहरण या खैरी गावाला म्हटले तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे शासनाला जाग कधी येणार ? असा प्रश्न पडला आहे.