महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धान पिकाच्या रखवालीसाठी गेलेल्या शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या - स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया बातमी

डुकरांपासून धान पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतात जाऊन धान पिकांची रखवाली करणाऱ्या शेतकऱ्याची हत्या झाली. पोलिसांनी संशयीत म्हणुन गावातील कन्हैया उके याला ताब्यात घेतले आहे. याचा पुढील  तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या

By

Published : Oct 11, 2019, 9:20 PM IST

गोंदिया- जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यात डुकरांपासून धान पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतात जाऊन धान पिकांची रखवाली करणाऱ्या शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या झाली. ही घटना तालुक्यातील रेंगेपार पांढरी येथे रात्रीच्या दरम्यान घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या

हेही वाचा-वूहान परिषद ते महाबलीपूरम बैठक, भारत चीनमधील ज्वलंत प्रश्न 'जैसे थे'

मृत शेतकऱ्याचे नाव मनोहर नंदलाल उके असे आहे. मनोहर नंदलाल उके हे आपल्या शेतात धानाचे डुकरांपासून संरक्षण करण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतात गेले होते. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर, गळ्यावर व हातांवर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली. ही बाब सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलीस पाटील कृष्णकुमार बोपचे यांनी डुग्गीपार पोलीस ठाण्यात माहिती दिली. माहितीच्या आधारावर ठाणेदार विजय पवार यांनी सदर माहिती तात्काळ आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर ठाणेदार पवार व त्यांचे पथक तात्काळ रेंगेपार येथील घटनास्थळी पोहोचले.

घटनास्थळाजवळ लोकांनी गर्दी केली होती. लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करुन पोलीसांनी घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळावर अज्ञात आरोपीचे पायांचे ठसे आढळून आले आहेत. गोंदिया येथील पोलीस नियंत्रण कक्षातील डॉग स्कॉड व फिंगरप्रिंट तज्ञ यांनी घटनास्थळी पाहणी केली. नंदलाल यांचे कोणाशी वाद किंवा भांडण होते का? याबाबत पोलीसांनी माहिती घेतली. यावेळी धनंजय यांच्या पुतण्याचे नाव समोर आले. नंदलाल यांनी डुग्गीपार पोलीस ठाण्यात शेताच्या वाटणीसंदर्भात फेब्रुवारी २०१९ मध्ये तक्रार दिली होती. पोलीसांनी संशयीत म्हणुन गावातील कन्हैया उके याला ताब्यात घेतले आहे. याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details