गोंदिया - सालेकसा तालुक्यातील ब्राह्मणटोला येथे शेतात काम करत असताना वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नारुलाल मोहजारे (वय 62) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
गोंदियात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे ही वाचा -#Jus्ticeForNimrita : पाकिस्तानात हिंदू तरुणीची हत्या; धर्मांतरासाठी बळजबरी केल्याचा संशय
मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होता. नारुलाल हे सकाळी घराजवळील शेतात औषध फवारणीसाठी गेले होते. यावेळी वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. सालेकसा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवला. घरातील प्रमुख मृत्यू पावल्याने नारुलाल यांच्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी गावकरी करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककाळा पसरली आहे.
गोंदियात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे ही वाचा -सरकारने सादर केलेल्या सिंचन घोटाळा प्रतिज्ञापत्रात अजित पवारांचं नाव नाही