गोंदिया- कर्जबाजारी आणि कोरोनाच्या संकटाला कंटाळून शेतकऱ्याने आपल्या शेतातच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. श्यामलाल गराडे (वय 60) असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना रावणवाडी येथे आज (सोमवार) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
गोंदिया जिल्ह्यात कर्जबाजारी आणि कोरोनाच्या संकटाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. श्यामलाल गराडे (वय 60) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
श्यामलाल गराडे यांनी विविध बँकांकडून कर्ज घेतले होते. कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या शेतकऱ्याला बँकांचा कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न निर्माण झाला. याला कंटाळून श्यामलाल गराडे यांनी स्वत:च्या शेतात गळफास घेवून आत्महत्या केली. याची महिती रावणवाडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला. पोलीस पुढील करत आहेत.