गोंदिया- बनावटी देशी दारूच्या कारखान्यावर गोंदिया गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत एकूण 6 लाख 58 हजार 620 रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. या बनावटी देशी दारूची विक्री दारूबंदी असलेल्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये केली जात असल्याचे सामोर आले आहे.
गोंदियात बनावटी दारूच्या कारखान्यावर गुन्हे शाखेचा छापा; साडे सहा लाखांचा माल जप्त - गोंदिया गुन्हे शाखा
बनावटी देशी दारूच्या कारखान्यावर गोंदिया गुन्हे शाखेने छापा टाकला. गुन्हे शाखेने छाप्यात एकुण 6 लाख 58 हजार 620 रुपयांचा माल जप्त करण्यात आहे.
शाम चाचेरे उर्फ पिंटी (रा. बाजपेयी वार्ड, गोंदिया) व विनोद जुलेल असे आरोपींची नावे आहेत. आरोपी बनावट देशी दारू तयार करत होते. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दारुची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने हरसिंगटोला-रतणारा येथील विनोद जुलेल यांच्या शेतावर गुरुवारी मध्यरात्री छापा टाकला. त्यामध्ये लाखो रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.
याठिकाणाहुन ३ लाख २८ हजार १२० रुपयांच्या किमतीचे बनावटी देशी दारूचे १३२ बॉक्स, २ लाख २५ हजार रुपये किमतीच्या ७८० लिटर केमिकल, दारूचा वास येण्याकरिता वापरण्यात येणारे फ्लेवर, मोकळ्या बॉटल, मोकळ्या बॉटलवर लावण्यासाठीच्या ब्रेडचे झाकण, देशी दारूचे कागद, लेबल, टेप, दारू बॉटलचे झाकण, पाण्याची मोटार, प्लास्टिक गाळणी, अल्कोहल लिटर पाण्याचे कैन, केमिकलचे मोकळे ड्रम इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. छाप्यामध्ये ६ लाख ५८ हजार ६२० रुपयांचा माल जप्त केला आहे. आरोपी शाम चाचेरे व विनोद जुलेल यांच्या विरोधात दवनीवाडा पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.