गोंदिया -राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोना नियमावली देखील कडक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असल्याशिवाय कर्नाटकामध्ये प्रवेश दिला जात नाही. इतर राज्यांनीही महाराष्ट्रातील नागरिकांना प्रवेश देण्यासाठी निर्बंध कडक केले आहेत.
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर ई टिव्ही भारतचा रिएलीटी चेक - महाराष्ट्र -छत्तीसगड सीमेवरील परिस्थिती
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर ई टिव्ही भारचा रिएलीटी चेक केला आहे. यावेळी महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवर कोणतीही तपासणी केली जात नसल्याचे समोर आले आहे.
![महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर ई टिव्ही भारतचा रिएलीटी चेक ETV bharat's reality check on Maharashtra and Chhattisgarh border](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10804223-84-10804223-1614435928088.jpg)
महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड सीमेवर ई टीव्ही भारतने रियालिटी चेक केला. यावेळी महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवर कोणतीही तपासणी केली जात नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून छत्तीसगडमध्ये जाणाऱ्या किंवा छत्तीसगड मधून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या लोकांची कोणतीही कोरोना तपासणी या ठिकाणी करत असल्याचे दिसून येत नाही आहे. कोरोना संदर्भातल्या नियमांची तपासणी करण्यासाठी कोणतीही सुविधा, चेक पोस्ट याठिकाणी उपलब्ध नाही. त्याच प्रमाणे कोणतेही पोलीस सुद्धा या सीमेवर दिसत नाहीत. त्यामुळे या सीमेवरून कोणताही व्यक्ती महाराष्ट्र जाऊ शकतो व महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती छत्तीसगड येथे जाऊ शकतो. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी ई टीव्ही भारत ने ग्राउंड रिपोट वर येऊन रिएलिटी चेक केला. यावेळी महाराष्ट्र व छत्तीसगड कोणतीही कोरोना तपासणी केलीजात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र व छत्तीसगड या ठिकाणी कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.