गोंदिया - 'शहरातील वाढते अतिक्रमण' शहरासाठी आता नवीन प्रश्न राहीलेला नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून नगर परिषदेच्यावतीने सतत अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाते. आजपासून पुन्हा शहरातील अतिक्रमण हटविण्यात येत असुन ही मोहीम दोन दिवस सुरू राहणार आहे.
गोंदिया नगरपरिषदेतर्फे अतिक्रमण हटाव मोहीम - Encroachment
नोटीस देऊनही अतिक्रमणे न हटवल्याने नगरपरिषदेतर्फे पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करण्यात आली.
![गोंदिया नगरपरिषदेतर्फे अतिक्रमण हटाव मोहीम](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3865068-239-3865068-1563365258613.jpg)
शहरातील आणि शहराबाहेरील अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केली आहे. कुडवा चौक येथील बाँबे सोफेवाला (वॉर्ड क्रमांक १०) तसेच बालाघाट टी पॉईंटवरील फुटपाथवाल्यांनी रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी किरकोळ अपघात घडत आहेत.
अतिक्रमण हटवावे, अशी नोटीस नगरपरिषदेने अतिक्रमण करणाऱ्या लोकांना आगोदरच दिली होती. मात्र, नोटिशीची मुदत संपली तरीही अतिक्रमण हटवले नसल्याने नगरपरिषदेतर्फे धडक कारवाई करण्यात आली. दरम्यान नगरपरिषदेने पोलीस बंदोबस्तात कारवाई केली.