गोंदिया- महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील बोरतलाव जंगल परिसरात सुरक्षा बल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ७ नक्षलवादी ठार झाले आहेत. यामध्ये ३ महिलांचा समावेश आहे. ही घटना आज (शनिवार) सकाळी छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यातील बोरतलाव, शेरपार व सीतागोटा डोंगराळ परिसरात घडली. घटना स्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
गोंदिया- छत्तीसगड सीमेवर चकमक.. सुरक्षा दलाकडून ७ नक्षलवाद्यांचा खात्मा - naxalits
या चकमकीत ७ नक्षवादी ठार झाले आहेत. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. ही घटना आज (शनिवार) सकाळी छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यात घडली.
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यापासून १५ किलोमीटर अंतरावर चकमक घडलेले ठिकाण आहे. कारवाई दरम्यान ७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. नक्षलवाद्यांकडून एके - ४७ बंदुका, १२ बोअरच्या बंदुका तसेच इतर शस्त्रात्रे जप्त करण्यात आले. तसेच या चकमकीत सुरक्षा दलाचे ३ जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
हल्ला घडवल्यानंतर गोंदिया जिल्ह्यात नक्षलवादी सुरक्षित स्थळी येतात. त्यामुळे गोंदियाला नक्षलवाद्यांचे 'रेस्ट झोन' म्हणूनही ओळखले जाते. 'गोंदिया पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी' व जनवादी क्रांतीकारी माओवादी संघटनेच्यावतीने २८ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत शहीद नक्षल सप्ताह पाळला जातो. या सप्ताहा दरम्यान नक्षलवाद्यांकडून मोठ्या घातपाताच्या घटना घडविल्या जातात. त्यामुळे सुरक्षा दलांकडून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला जातो.