महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियाच्या 11 पोलीस अधिकारी कर्मचा-यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर - Maharashtra Police

गोंदिया जिल्ह्याच्या आस्थापनेवरील तीन पोलीस अधिकारी व आठ पोलीस कर्मचारी अशा एकूण ११ पोलिसांना हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकांच्यावतीने पदक जाहीर करण्यात येते.

eleven gonida police get award form dpp
गोंदियाच्या 11 पोलीस अधिकारी कर्मचा-यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

By

Published : May 2, 2020, 9:41 AM IST

Updated : May 2, 2020, 1:19 PM IST

गोंदिया- महाराष्ट्र पोलीस विभागात कर्तव्यावर असताना केलेल्या कामगिरीबद्यल जिल्ह्यातील ११ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले आहे. ३० एप्रिल रोजी पोलीस महासंचालक कार्यालयाने सन २०१९-२० या कालावधीत महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट काम करणाऱ्या ८०० अधिकारी-कर्मचा-यांना प्रशस्ती पत्र व सन्मानचिन्ह जाहीर केले आहे.

गोंदियाच्या 11 पोलीस अधिकारी कर्मचा-यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

गोंदिया जिल्ह्याच्या आस्थापनेवरील तीन पोलीस अधिकारी व आठ पोलीस कर्मचारी अशा एकूण ११ पोलिसांना हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पोलीस अधिका-यांत नक्षल ऑपरेशन सेल, देवरीचे सहायक पोलीस निरीक्षक नागेश भास्कर , नक्षल ऑपरेशन सेल गोंदियाचे प्रमोदकुमार केशरीचंद बघेले, बिनतारी संदेश विभाग,देवरीचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप यादवराव जाधव यांचा समावेश आहे.

पोलीस कर्मचारी पोलीस हवालदार रमेश रामकृष्ण खंडाते, नक्षल सेल गोंदिया येथील स्वर्णदीप युध्दराज भालाधरे , राजेंद्र लक्ष्मण भेंडारकर , रीना रामलाल चव्हाण , सुदर्शन नत्थू वासनिक , पोलीस मुख्यालय येथील मुस्ताक अहमद वारीस सय्यद , प्रभाकार कवडू पालांदुरकर , सायबर सेलचे धनंजय पुरनलाल शेंडे यांचा समावेश आहे.

Last Updated : May 2, 2020, 1:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details