महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणुक विभागाकडे चार वर्षांपासुन एसटीचे १४ लाख रूपये थकीत;  गोंदिया आगरावर बोझा वाढला

राज्य परिवहन महामंडळाकडून निवडणुक कामासाठी बसेस भाड्याने दिल्या जातात. सन २०१५ मधील जिल्हा परिषद व ग्रामपंचायत तसेच सन २०१७ मधील ग्रामपंचायत निवडणुकीसाठीनिवडणुकीसाठी बसेस भाड्याने घेण्यात आल्या होत्या.

गोंदिया बस डेपो

By

Published : Aug 2, 2019, 5:28 PM IST

गोंदिया- नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकासाठी जिल्ह्यात मतदान साहित्य पोहचविण्यासाठी व आणण्यासाठी १२० एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी गोंदिया, तिरोडा व साकोली आगारातील बसेस घेतल्या गेल्या होत्या. मात्र, निवडणुक विभागाकडे भाड्याची रक्कम १४ लाख ७४ हजार ३६४ रुपये थकीत असुन ही रक्कम अद्याप मिळालेली नाही. तसेच गोंदिया आगाराने वारंवार पत्रव्यवहार व मागणी करूनही महामंडळाला अद्याप रक्कम मिळाली नसल्याने गोंदिया आगरावर बोझा वाढतच चाललेला आहे.

संजना पटले-आगार व्यवस्थापक, गोंदिया यांची प्रतिक्रिया

राज्य परिवहन महामंडळाकडून निवडणुक कामासाठी बसेस भाड्याने दिल्या जातात. सन २०१५ मधील जिल्हा परिषद व ग्रामपंचायत तसेच सन २०१७ मधील ग्रामपंचायत निवडणुकीसाठीनिवडणुकीसाठी बसेस भाड्याने घेण्यात आल्या होत्या. त्याचे ८ लक्ष ७४ हजार १२८ रुपये मिळाले नाही. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे ६ लक्ष १० हजर २३६ रुपयेही गोंदिया आगाराला मिळालेले नाहीत.

महामंडळाने निवडणुकीसाठी १२० बसेसमध्ये नियोजन केले होते. यात गोंदिया आगारातील ६२, तिरोडा आगारातील २९ तर साकोली आगारातील २९ निवडणुकीत दिल्या होत्या. यात गोंदिया आगारातील २३ बसेस गोंदिया विधानसभा मतदारसंघात तर ३९ बसेस अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघात दिल्या. तिरोडा आगारातील २९ बसेस तिरोडा विधानसभा मतदारसंघात दिल्या. तर साकोली आगारातील २९ बसेस आमगाव विधानसभा मतदारसंघात दिल्या. तसेच मतदान प्रक्रिया आटोपल्यावर मतदान कर्मचारी व साहित्य स्ट्राँगरूम पर्यंत पोहचण्याचे कामही पूर्ण झाले. यासाठी आगाराने प्रत्येकी २१ हजार ५०० रूपयांची मागणी निवडणुक विभागाकडे केली होती. मात्र, निवडणुका झाल्या व निकाल आला तरीही गोंदिया आगारला अद्याप पैसे मिळालेले नाहीत.

ABOUT THE AUTHOR

...view details