महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदिया : देवरीत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रावण दहन - दसरा २०२० न्यूज

गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरात दसरा उत्सव समितीच्या वतीने रावण दहन करून विजयादशमी उत्सव साजरा करण्यात आला. कोरोनामुळे कमी लोकांच्या उपस्थितीत हा रावण दहनाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी फेसबुक आणि लोकल केबलसह इतर सोशल मीडियातून रावण दहनचे कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण लोकांपर्यंत करण्यात आले.

Dussehra 2020: Ravan Dahan in gondia Deori city
गोंदिया : देवरीत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रावण दहन, केलं लाइव्ह प्रक्षेपण

By

Published : Oct 26, 2020, 7:52 AM IST

गोंदिया - रावणावर प्रभु रामचंद्र यांनी विजय मिळविला याचे औचित्य साधून दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची परंपरा अनेक काळापासून सुरू आहे. मात्र या वर्षी कोरोनाचा संसर्ग असल्याने अनेक सार्वजनिक उत्सवावर विरजन पडले आहे. त्याचप्रमाणे रावण दहन कार्यक्रमावरही याचा परिणाम झाला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रावण दहनचे कार्यक्रम रद्द करण्यात आले तर काही ठिकाणी मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.

देवरीत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रावण दहन...

गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरात दसरा उत्सव समितीच्या वतीने रावण दहन करून विजयादशमी उत्सव साजरा करण्यात आला. तर या वेळी कोरोना विषाणूचा संसर्ग पाहता कार्यक्रमामध्ये कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय उपाय योजना करावे, या बाबतचे माहिती फलक या ठिकाणी लावण्यात आले होते. तसेच मोक्याच्या ठिकाणी कमी लोकांच्या उपस्थितीत रावणाचा दहन करण्यात आला. यावेळी फेसबुक आणि लोकल केबलसह इतर सोशल मीडियातून रावण दहनचे कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण लोकांपर्यंत करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details