महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दारूच्या नशेत 19 वर्षीय मुलाने केली वडिलांची केली हत्या; गोंदियातील धक्कादायक प्रकार - son killed father gondia

रुपलाल धुर्वे हे घरी असताना आरोपी मयूर धुर्वे (वय - 19) हा दारूच्या नशेत घरी आला. तसेच आपल्या वडिलांसोबत भांडण करू लागला. यावेळी त्याने दारूच्या नशेत घरात ठेवलेली कुऱ्हाडीने वडिलांच्या डोक्यावर, आणि शरीरावर वार केले. यात त्यांच्या मृत्यू झाला.

आमगाव पोलीस ठाणे, गोंदिया
आमगाव पोलीस ठाणे, गोंदिया

By

Published : Mar 21, 2020, 11:17 PM IST

गोंदिया - दारूच्या नशेत एका 19 वर्षीय मुलाने आपल्या 52 वर्षीय वडिलांची कुऱ्हाडीने हत्या केल्याची घटना घडली. ही घटना जिल्ह्यतील आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तिगाव येथे घडली. रुपलाल धुर्वे (वय - 52) असे मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी 6 ते 7 च्या दरम्यान घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दारूच्या नशेत 19 वर्षीय मुलाने केली वडिलांची केली हत्या.

रुपलाल धुर्वे हे घरी असताना आरोपी मयूर धुर्वे (वय - 19) हा दारूच्या नशेत घरी आला. तसेच आपल्या वडिलांसोबत भांडण करू लागला. यावेळी त्याने दारूच्या नशेत घरात ठेवलेली कुऱ्हाडीने वडिलांच्या डोक्यावर, आणि शरीरावर वार केले. यात त्यांच्या मृत्यू झाला. ते मजूरी करून घर चालवत असत. त्यात मृताची पत्नी आजारी असते. या आधी अनेकदा मुलाचे आणि वडिलांचे भांडण झाले होते. मात्र, यावेळी आरोपी मुलाने दारूच्या नशेत वडिलांची कुऱ्हाडीने हत्या केली.

हेही वाचा -कोरोनाने घेतला दोघा क्रीडा पत्रकारांचा बळी

आमगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. तसेच आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मृतदेह आमगाव रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक शामराव काळे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details