गोंदिया - जिल्ह्यात आमगाव वनपरिक्षेत्रा अतर्गत येणाऱ्या अंजोरा बिट परिसरातील जैतुरटोला वन परिक्षेत्रात पाण्याच्या शोधात काळवीट आले होते. या काळवीटाचा कुत्र्यांनी पाठलाग करून त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात काळवीट जखमी झाले होते. बुधवारी त्याच काळवीटाचा मृत्यू झाला.
कुत्र्यांच्या हल्ल्यात काळविटाचा मृत्यू, जैतुरटोला जंगल परिसरातील घटना - जैतुरटोला जंगल
येरमडा ग्रामपंचायत अंतर्गत येणारा जैतुरटोला वन परिक्षेत्रात काळवीट पाण्याच्या शोधात आले होते. काळविटाचा कळप गाव सीमेलगतच आढळताच गावातील कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला. यात एक काळवीट जखमी झाले. या जखमी काळवीटला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपचाराकरता पशु वैधकीय रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान काळवीटाचा मृत्यू झाला.
येरमडा ग्रामपंचायत अंतर्गत येणारा जैतुरटोला वन परिक्षेत्रात काळवीट पाण्याच्या शोधात आले होते. काळविटाचा कळप गाव सीमेलगतच आढळताच गावातील कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला. यात एक काळवीट जखमी झाले. या जखमी काळवीटला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपचाराकरता पशु वैधकीय रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान काळवीटाचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणी नंतर मृत काळवीटाला वन विभागाने जाळले. आमगाव परिक्षेत्रात वन्यजीवांचे अपघाती व कुत्र्यांच्या शिकारीने मृत्यू होण्याच्या संख्येत वाढ होत असल्याने वन्यजीव प्रेमीकडून वन्यजीवांच्या संरक्षणाकरता नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.