गोंदिया - जिल्ह्यातील देवरी तालुका नक्षलग्रस्त तालुका आहे. देवरी येथे शिक्षण घेण्यासाठी जंगलव्याप्त डोंगराळ भागातून विद्यार्थी येतात. तेव्हा त्यांना शाळेत येताना त्रास होतो. त्यामुळे शासकीय आश्रम शाळा गनुटोला येथील शालेय मुलींना जिल्हा पोलीस दल व लेस्ट् टिच वन सामाजिक संस्था मुबंईच्यावतीने सायकल वाटप करण्यात आल्या.
नक्षलग्रस्त भागातील मुलींना सामाजिक संस्थेकडून सायकल वाटप
जिल्ह्यातील देवरी तालुका अतिसंवेदनशील असून आदिवासी बहुल आहे. त्यामुळे येथील समाजाचे मागासलेपण कमी झालेले नाही. येथील विद्यार्थी शिक्षणासाठी जंगलातून वाट काढत चालत शाळेत जातात.
हेही वाचा-कुठल्याही धमकीला न घाबरता संमेलनाच्या उद्घाटनाला जाणार - उद्घाटक ना. धों. महानोर
यावेळी विद्यार्थ्यांना भविष्याचे धडेही देण्यात आले. या कार्यक्रमात येथील मुलींनी आदिवासी नृत्य सादर केले. जिल्ह्यातील देवरी तातुका अतिसंवेदनशील असून आदिवासी बहुल आहे. त्यामुळे येथील समाजाचे मागासलेपण कमी झालेले नाही. येथील विद्यार्थी शिक्षणासाठी जंगलातून वाट काढत चालत शाळेत जातात. त्यामुळे मुंबईच्या एका संस्थेने व गोंदिया पोलीस विभागाने पुढाकार घेत या विद्यार्थांना सायकल वाटप केल्या.