महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धापेवाडा ग्रामपंचायत परिचारकाचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू - Dawniwada Police News Gondia

गणराज हे धापेवडा येथे बाजारसाठी गेले होते. दरम्यान ते गावा जवळ असलेल्या वैनगंगा नदीत आंघोळ करायला गेले. मात्र, नदीच्या खोलीचा अंदाज न लागल्याने त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. याबाबत गावातील लोकांना माहिती मिळताच त्यांनी गणराज यांचा मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढला.

gondia
गणराज सोनावने

By

Published : Nov 28, 2019, 11:43 PM IST

गोंदिया- तालुक्यातील धापेवाडा येथील ग्रामपंचायत कार्यालयातील एका परिचारकाचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास धापेवाडा गावाजवळ घडली. गनराज मंसाराम सोनावने (वय.४०) असे मृत परिचारकाचे नाव आहे.

गणराज हे धापेवडा येथे बाजारसाठी गेले होते. दरम्यान ते गावा जवळ असलेल्या वैनगंगा नदीत आंघोळ करायला गेले. मात्र, नदीच्या खोलीचा अंदाज न लागल्याने त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. याबाबत गावातील लोकांना माहिती मिळताच त्यांनी गणराज यांचा मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढला. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून गणराज यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी व शवविच्छेदनासाठी गोंदिया जिल्हा केटीएस सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले. या घटनेचा पुढील तपास दवनीवाडा पोलिसांकडून केला जात आहे.

हेही वाचा-चालकाच्या मृत्यूनंतर कंपनीला आली जाग; मागण्या पूर्ण करण्याचे दिले लेखी पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details