गोंदिया - श्रावणातला पहिला सोमवार तसेच नागपंचमी निमित्त जिल्ह्यातील नागरा येथील पुरातन कालीन पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेण्याकरीता मंदिरात भाविकांनी गर्दी केली. पूर्व महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या मंदिरात दर्शन घेण्याकरता भाविकांनी सकाळ 4 वाजेपासून रांगा लावल्या होत्या.
पुरातन कालीन पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी
श्रावणातल्या पहिला सोमवार तसेच नागपंचमी निमित्त जिल्ह्यातील नागरा येथील पुरातन कालीन पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेण्याकरीता मंदिरात भाविकांनी गर्दी केली. या मंदिराची वास्तू दगडात बांधलेले असून मनाला मोहून टाकणारी आहे. गीताप्रेस गोरखपूर येथे प्रकाशित होणाऱ्या 'कल्याण' मासिकाच्या 1951 सालच्या प्रतीमध्ये या मंदिराचा उल्लेख केला गेला आहे.
शिव मंदिराचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांतुन भाविक मोठ्या संख्येने येत असतात. आज सकाळपासूनच मंदिरात भाविकांचीप्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. भाविकांची गर्दी पाहता मंदिर आज मध्यरात्री पर्यंत खुले राहणार आहे.
या मंदिराची वास्तू दगडात बांधलेले असून मनाला मोहून टाकणारी आहे. या मंदिरासंबंधी एक विशेष बाब म्हणजे, गीताप्रेस गोरखपूर येथे प्रकाशित होणाऱ्या 'कल्याण' मासिकाच्या 1951 सालच्या प्रतीमध्ये या मंदिराचा उल्लेख केला गेला आहे. यावरून हे मंदिराची महती सिद्ध होते.