गोंदिया - देवरी पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या मौजा कोयलारी या गावात एक व्यक्ती अवैधरीत्या गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारावर देवरी पोलिसांनी सापळा रचत त्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्या जवळून २ किलो ५४० ग्रम गांजा जप्त करण्यात आला आहे. हिरालाल तुकाराम मेश्राम (५०, रा. कोयलारी) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
गांजा बाळगणाऱ्यांवर गोंदियात पोलिसांची धडक कारवाई - गोंदिया गुन्हे वार्ता
मौजा कोयलारी या गावात अवैधरीत्या गांजा विक्री करणाऱ्या एक व्यक्तीला देवरी पोलिसांनी अटक केली आहे.
गांजा बाळगणाऱ्यांवर देवरी पोलीसांची धडक कारवाई
हिरालाल मेश्राम यांने आपल्या घराजवळील धानाच्या शेतात गांजा लपून ठेवला होता. पोलिसांनी धाड टाकत तिथून वाळलेला २ किलो ५४० ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या गांज्याची किंमत २० हजार ४०० रुपये एवढी आहे. पोलिसांनी हिरालाल तुकाराम मेश्राम यांना अटक केली आहे.