महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदिया : वाहतुकीसाठी एसटी बसेस सॅनिटाईझ करून सज्ज, मात्र प्रशासनाच्या लेखी आदेशाची प्रतीक्षा - st transport for gondia

जिल्हा ग्रीन झोनमध्ये असूनही जिल्ह्यात एसटी बसेसची वाहतूक बंद आहे. त्यामुळे मिळेल त्या साधनाने अनेक प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. तर, दुसरीकडे एसटी महामंडळातर्फे एसटीचे निर्जंतुकीकरण करून जिल्हाधिकारी यांचा लेखी आदेशाच्या प्रतिक्षेत आहे.

गोंदिया जिल्यात एस टी बसेस जिल्हा वाहतुकीसाठी स्यानीटायझीग करून सज्ज
गोंदिया जिल्यात एस टी बसेस जिल्हा वाहतुकीसाठी स्यानीटायझीग करून सज्ज

By

Published : May 6, 2020, 8:35 AM IST

Updated : May 6, 2020, 1:01 PM IST

गोंदिया - जिल्हा ग्रीन झोनमध्ये असला तरीही या ठिकाणी केंद्र शासनाचा निर्देशाप्रमाणे आवश्यक त्या बाबी अद्याप सुरू झाल्या नसल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वदूर आहे. तर, लगतचा गडचिरोली जिल्हासुद्धा ग्रीन झोनमध्ये असून या ठिकाणी ५० टक्के एसटीची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, असे असले तरीही गोंदिया जिल्ह्यात एकही एसटी बस प्रवाशांकरता सोडण्यात आलेली नाही.

माहिती देताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

जिल्हा ग्रीन झोनमध्ये असूनही जिल्ह्यात एसटी बसेसची वाहतूक बंद आहे. जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता ग्रामस्थांना मोठे अंतर कापावे लागते. त्या दृष्टिकोनातून एसटीचा प्रवास हा सोईस्कर होतो. मात्र, असे असले तरीही मिळेल त्या साधनाने अनेक प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. तर, दुसरीकडे एसटी महामंडळातर्फे एसटीचे निर्जंतुकीकरण करून जिल्हाधिकारी यांचा लेखी आदेशाच्या प्रतीक्षेत आहे. एकंदरीतच आज ग्रीन झोनमध्ये असलेल्या जिल्ह्याची स्थिती पाहता या बत लवकरच तोडगा काढणार असल्याचे स्पष्टीकरण विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

Last Updated : May 6, 2020, 1:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details