महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जन्म देताच पाडसाला सोडून हरिण पळाली जंगलात - पाडसाला जन्म देताच जन्मदाती हरिण पळाली जंगलात

गोंदिया जिल्ह्यातील कोसमतोंडी हेटी गावातील एका शेतात हरणाने पाडसाला जन्म दिला. मात्र, जन्म देताच हरिण पाडसाला सोडून तेथून निघून गेले. मात्र, शेतात काम करणाऱ्या कामगारांच्या सतर्कतेमुळे ते पाडस वनविभाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आले.

Deer Puppie Found in gondia
जन्म देताच पाडसाला सोडून हरिण पळाली जंगलात

By

Published : Jan 29, 2020, 10:58 PM IST

Updated : Jan 29, 2020, 11:48 PM IST


गोंदिया - जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी हेटी गावातील शेतात हरणाणे एका पाडसाला जन्म दिला. मात्र, जन्म देताच हरिण जंगालाच्या दिशेने पळून गेली. शेतात काम करणाऱ्या काही कामगारांना हे पाडस दिसताच त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. त्या पाडसाला वनविभागाने ताब्यात घेतले असून, त्याच्यावर प्रथमोपचार सुरू आहेत.

जन्म देताच पाडसाला सोडून हरिण पळाली जंगलात


सकाळच्या सुमारास मुनेश्वर गहाणे यांच्या शेतात हे पाडस आढळून आले. गहाणे यांना तत्काळ शेतात काम करणाऱ्या कामगारांनी माहिती दिली. गहाने यांनी त्वरीत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन पाडसाला त्यांच्या ताब्यात दिले. शेतातील मजुरांची खळबळ ऐकून त्या पाडसाची आई निघून गेली असावी. जर हे पाडस कुत्रे किंवा इतर कोणत्याही जनावरांना आढळले असते तर त्याला स्वत:चा जीव गमवावा लागला असता. मात्र, गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे या पाडसाला जीवदान मिळाले आहे. पाडसावर प्रथमोपचार करून जंगलात सोडून दिले जाणार आहे.

Last Updated : Jan 29, 2020, 11:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details