महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रस्ता ओलांडताना वनविभागाच्या कुंपणाला धडकून हरणाचा मृत्यू - गोंदियात वनविभागाच्या कुंपणाला धडकले हरीण

खमारी उपकेंद्राजवळ रस्ता ओलांडताना वनविभागाच्या कुंपणाला हरीण धडकले. या घटनेत हरणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेतली.

Gondia
मृत हरीण

By

Published : Jun 17, 2020, 3:11 PM IST

गोंदिया - भरकटलेली हरीण रस्ता ओलांडताना वनविभागाच्या कुंपणाला धडकल्याने त्या हरणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गोंदिया तालुक्यातील खमारी येथे आज सकाळी घडली.

याच कुंपणाला धडकून हरीण ठार झाले

आज सकाळी खमारी उपकेंद्राजवळ रस्ता ओलांडताना वनविभागाच्या कुंपणाला हरीण धडकले. या घटनेत हरणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वनविभागाने पशुसंवर्धनच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली. पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी हरणाचे शविच्छेदन केले. त्यानंतर या हरणाचा अंतविधी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details