गोंदिया -जिल्ह्यातील अर्जुनी मोरगांव तालुक्यात अचानक वातावरण बदलले. ढगाळ वातावरण होऊन विजेचा कड कडटासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. नवेगाव बांध येथे अचानक सुरू झालेल्या पावसात वीज पडल्याने हरी तुळशिराम लांडेकर (वय ५८) यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा -गोंदिया जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका
नवेगांव बांध सानगडी मार्गावरील नवोदय विद्यालयाजवळ घटना घडली. मृत सायकलने गावो-गावी जावून कपडे विकण्याचा व्यवसाय करत होता. सकाळी आपल्या घरून सायकलवर कपडे घेऊन विकण्यासाठी निघाला होता. घराकडे परत येत असताना 6 वाजण्याच्या दरम्यान त्याच्यावर वीज पडून मृत्यू झाला. वीजेच्या आवाजाने परिसरातील नागरिकांना हादरवून सोडले. सदर घटनेची माहिती नवेगांव बांध पोलीस ठाण्याला होताच ठाणेदार अनिल कुभंरे घटनास्थळी पोहचले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नवेगाव बांध येथे पाठवण्यात आला आहे.
हेही वाचा -गोंदियात एस.टी महामंडळाची बस पलटली; ३० ते ४० प्रवासी जखमी