महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सदृढ आरोग्यासाठी गोंदियात 'एक दिन सायकल के नाम' उपक्रमाचे आयोजन - health

गोंदिया शहरात सायकल चालवत लोकांना सायकल चालवा पर्यावरण वाचावा, प्रदूषणावर नियंत्रण मिळावा.

गोंदियात सायकलिंगचे आयोजन

By

Published : May 12, 2019, 7:53 PM IST

गोंदिया - 'एक दिन सायकल के नाम' या उपक्रमाद्वारे प्रदूषणावर नियंत्रण मिळविता यावे आणि आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी गोंदिया शहरात जेसीआई गोंदिया राईस सिटी ग्रुप व आज फोरमच्या संयुक्त विद्यमाने आठवड्यात दर रविवारी सायकलिंग केले जात आहे. शहरातील शकेडो तरुण तरुणी या सायकल वाकथॉनमध्ये सहभाग घेत आहेत.

गोंदियात सायकलिंगचे आयोजन

या उपक्रमाने १०० आठवडे पूर्ण करीत सायकल चालवून निरोगी राहण्याचा संदेश दिला आहे. दोन वर्षापूर्वी जेसीआई गोंदिया आणि आज फोरम याने गोंदिया शहरात सायकल चालवून निरोगी राहावे, यासाठी गोंदिया शहरात दर रविवारी सायकल वॉकथॉन स्पर्धा सुरु केली.
गोंदिया शहरात एक दिन सायकल के नाम या उपक्रमाद्वारे दर रविवारी १० ते १५ किलोमीटर सायकल चालवून पर्यावरण वाचविण्याच्या उद्देशाने तसेच प्रदूषणावर नियंत्रण मिळवावा व आपले आरोग्य उत्तम ठेवता यावे या उद्देशाने जेसीआई गोंदिया राईस सिटी व आज फोरम या दोन्ही ग्रुप ने १८ जून २०१७ ला या उपक्रमाची सुरवात केली. आज १२ मे ला या उपक्रमा ला १०० आठवडे पूर्ण झाले आहे. या उपक्रमात युवक तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सभागी झाले. व सायकल वोकथॉनमध्ये सह्भाग घेतला आहे. आज गोंदिया शहरात सायकल चालवत लोकांना सायकल चालवा पर्यावरण वाचावा, प्रदूषणावर नियंत्रण मिळावा, आरोग्य उत्तम ठेवा या घोषणा देत सायकल वॉकथॉनमध्ये सहभागी झाले होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details