गोंदिया -जिल्ह्याच्या नवेगांव बांध येथे दोन डोके, चार डोळे असलेल्या वासराचा जन्म झाला असून, या अनोख्या वासराला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. नवेगांव बांध येथील आझाद चौकातील रहिवाशी, शेतकरी दिनेशचंद्र उजवणे यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून पाळीव गायी आहेत, त्यातील एका गाईने 26 मार्च रोजी शुक्रवारी दुपारच्या सुमारास एका वासराला जन्म दिला. या वासराला दोन डोके व चार डोळे आहेत. हे वासरू परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे.
दोन डोके, चार डोळे असलेल्या वासराला पाहाण्यासाठी नागरिकांची गर्दी - Gondia District Latest News
जिल्ह्याच्या नवेगांव बांध येथे दोन डोके, चार डोळे असलेल्या वासराचा जन्म झाला असून, या अनोख्या वासराला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. नवेगांव बांध येथील शेतकरी दिनेशचंद्र उजवणे यांच्याकडे असलेल्या गायीने या वासराला जन्म दिला आहे. हे वासरू परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे.
वासराचे फोटो व्हायरल
या वासराला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. शेतकरी दिनेशचंद्र उजवणे यांच्याकडे अनेक गायी, बैल आहेत. गो पालन हा त्यांचा छंदच आहे, यांत्रिक युगात शेतीची सर्व कामे शेतकरी यंत्रांच्या सहायाने करतात. त्यामुळे खेड्यातील गोधन देखील कमी होत आहे. चाऱ्याची देखील समस्या असते. असे असताना देखील त्यांनी हा छंद जपला आहे. त्यासाठी त्यांनी दोन-तीन नोकर देखील ठेवले आहे. ते या सर्व प्राण्यांची काळजी घेतात. दरम्यान त्यांच्या गायीने दोन तोंडाच्या वासराला जन्म दिल्याने ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. लोकांनी हे वासरू पाहण्यासाठी गर्दी केली होती. या वासराचे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहेत.